लहानपणी यातलं आपल्याला काही कळत जरी नसलं तरी आजही हि प्रतिज्ञा आपल्याला तोंडपाठ आहे..
पण मग ज्या संविधानाने आपल्याला जीवन (हो जीवनच) दिलंय ते कधी कोणी पूर्ण वाचलंय का?? (किमान ऐकलंय का??)
आम्ही भारताचे लोक.. यापुढं काय हे आठवतही नाय..
असो, तर हे भारताचं संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर यांना हे संविधान लिहायला (म्हणजे फक्त लिहायला नव्हे तर भारतातील प्रत्येक सूक्ष्म घटकाचा अभ्यास करून लिहायला) २ वर्षं ११ महिने १८ दिवस लागले.. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे लिहून पूर्ण झालं आणि २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणलं गेलं.. आणि या स्वतंत्र भारतातील आपण स्वैर नागरिक हे संविधान वाचण्यात एकही दिवस न घालवता 'आंबेडकरांनी किती भेदभाव केले' असं हेपलत (बोंबलत) सुटतो..
आपण स्वतः ला भारतीय म्हणवून घेताना यातल्या किमान काही महत्त्वाच्या गोष्टी आपण स्मरणात ठेवल्या तरी बाबासाहेबांचा सन्मान होईल..
आपल्या संविधानात ३९५ कलमे आहेत आणि हि सर्व २२ भागांत विभागली आहेत..
यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संविधानातल्या भाग ३ मधील कलम १९ अ नुसार प्रत्येक भारतीयाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.. (याचा गैरफायदा घेऊन आपण भारतीय फक्त दुसऱ्यांची बदनामी करतो हे वेगळं सांगायला नकोच)
भाग १ मधल्या १ ते ४ मध्ये केंद्र (म्हणजे भारत) आणि त्याचे प्रदेश (म्हणजेच राज्य) यांबद्दलच्या तरतूदी केल्या आहेत..
भाग २ या कलम ५ ते ११ मध्ये नागरिकत्त्वाबद्दल तरतुदी आहेत तर भाग ३ च्या कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत अधिकार सांगितले आहेत..
या मूलभूत अधिकारांमध्येही कलम २१ अ हे शिक्षणाचा अधिकार सांगतं, कलम २३ मध्ये मानवी तस्करी आणि सक्तीच्या कामगारांवर प्रतिबंध याबाबत लिहिलंय तर कलम २४ मध्ये बालकामगार प्रतिबंधाविषयी माहिती आहे..
यानंतर कलम ७८ मधल्या 'पंतप्रधानांची कर्तव्ये' वाचायलाही हरकत नाहीये..
कलम ३३५ नुसार अनुसूचित जाती आणि जमातींच्या सर्व्हिसेस आणि पोस्ट्सबाबतही वाचायला मिळेल..
आणि हक्कांसोबत येणारी कर्तव्यं कलम ५१ अ मध्ये दिलीयेत, तीही जमलं तर वाचायला हवीत..
कारण आपल्याला फक्त हे माझं ते माझं असं मागायची सवय झालीये पण त्या हक्कांपाठोपाठ आपली काय कर्तव्यं येतात हे कोणीच बघायला मागत नाय..
आपल्या संविधानात एका अखंड भूभागाला एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता आहे आणि हे फक्त वाचल्यावरच कळतं..
एक लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची खूप वैशिष्ट्ये आहेत आणि हि वैशिष्ट्ये लक्षात घेऊन ज्या मानवाने हे संविधान तयार केलंय त्यांना आज आपण पुन्हा त्याच जातीव्यवस्थेत गुंडाळून ठेवलंय..
भारत काय आहे हे संविधान वाचल्यावर कळतं.. आणि उगाच देशाच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनी तर नक्कीच हे वाचावं..
मातीत काम करणाऱ्या सामान्य नागरिकापासून देशाचा पहिला नागरिक असणाऱ्या प्रत्येकासाठी हे संविधान आहे आणि हो, आपल्यासाठीच आहे, आपलंच आहे..

तर मग या संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान निर्मात्याला आणि संविधानाला त्रिवार अभिवादन..
भारतीय संविधान चिरायू होवो..!!❤️
.
.
.
प्राchi.. 💞